सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई तसेच राज्यातील इतर शहरांतील अनेक सोसायट्या व वस्त्या तसेच कॉलनीमध्ये जंतूनाशकांची फवारणी करणे सुरू आहे. परंतु या जंतूनाशकांच्या बेसुमार आणि अवाजवी फवारणीमुळे अपाय होऊ शकतो, त्यामुळे अशी फवारणी करू नये आणि करायची असल्यास  संबंधित महानगरपालिका प्रत्यक्ष त्या भागाची  तपासणी करून आवश्यकता भासल्यास स्वतः फवारणी करेल असे आज कोरोनासाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाच्या बैठकीत ठरले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,  अनिल परब,  मुख्य सचिव अजोय मेहता व वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपास्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली.

Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर
sharad pawar arvind kejriwal
“केजरीवालांची अटक भाजपासाठी बुमरँग ठरेल”, २०१५, २०२० च्या निवडणुकींचा दाखला देत शरद पवारांचं वक्तव्य

करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता संपूर्ण मुंबईभर पालिकेने निर्जतुकीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून पालिकेने कस्तुरबा रुग्णालय आणि आर्थर रोड तुरुंग परिसरात काल विशेष निर्जतुकीकरण मोहीम हाती घेतली होती. हा परिसर सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील झाल्यामुळे पालिके च्या जी दक्षिण विभागाने या परिसरात औषधाची फवारणी के ली गेली.

करोनाची साथ तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये म्हणून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र औषध फवारणी के ल्यामुळे करोनाची साथ पूर्णपणे मिटणार नाही, त्याकरीता लोकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.