26 February 2021

News Flash

दोन वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली

१७ पोलीस अधिकाऱ्यांना ‘आयपीएस’ होण्याची संधी

केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य सरकारच्या पत्रप्रपंचात गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ रखडलेला राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) संवर्ग पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या १३ जुलै रोजी के ंद्रीय लोकसेवा आयोगाकडे याबाबत बैठक होणार असून त्यात ५१ जणांच्या यादीतील १७ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती गृहविभागातील सूत्रांनी दिली.

अखिल भारतीय पोलीस सेवेत दरवर्षी २५ टक्के जागा स्थानिक राज्य पोलीस सेवेतून भरल्या जातात. त्यासाठी प्रत्येक राज्य आपल्या राज्याच्या कोटय़ानुसार पात्र उमेदवारांचे प्रस्ताव केंद्रीय लोकसेवा आयोगास पाठवितात. त्यानंतर लोकसेवा आयोग पात्र उमेदवारांची निवड करून अंतिम यादी केंद्र सरकारला कळविते. राज्य पोलीस सेवेत अधीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर त्यांची भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) पदोन्नती होते. त्यासाठी राज्य कोटय़ातील २०१७ आणि २०१८ तसेच संवर्गात वाढलेल्या अशा ‘आयपीएस’च्या एकूण १७ जागा रिक्त आहेत. त्यासाठी सेवाज्येष्ठतेनुसार २००२च्या तुकडी पर्यंतच्या ५१ पात्र अधिकाऱ्यांच्या प्रस्तावाची यादी गृहविभागाने लोकसेवा आयोगास पाठविली. मात्र आयोग आणि राज्य सरकार यांच्या पत्रव्यवहारात गेली दोन अडीच वर्षे हा प्रस्ताव अडकू न पडला आहे. मार्च महिन्यात या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी आयोगाने बोलावलेली बैठकही करोना परिस्थितीमुळे रद्द झाली.

याबाबत काही अधिकाऱ्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यानुसार सरकारच्या विनंतीनंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने येत्या १३ जुलै रोजी बैठक बोलावली असून त्यासाठी मुख्य सचिव, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना बैठकीला बोलावण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:17 am

Web Title: opportunity for 17 police officers to become ips abn 97
Next Stories
1 वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत १४ जुलैला धोरणनिश्चिती!
2 पालिका मुख्यालय आपत्कालीन विभागातील २५ करोना मुक्त कर्मचारी तात्काळ सेवेत दाखल!
3 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर बोलावली शिवसेना मंत्र्यांची तातडीची बैठक
Just Now!
X