मुंबई : राज्यातील पूरग्रस्त सात जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना २७ जुलैपर्यंत होणाऱ्या जेईई (मुख्य) तिसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर जाता आले नाही, तर त्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला.

कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली व सातारा जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूरस्थितीमुळे या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात या परीक्षेसाठी केंद्रांवर पोचता येईल किंवा नाही आणि घरातच पुराचे पाणी घुसल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ही परीक्षा कशी द्यायची, ही चिंता होती. त्यामुळे जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांना आणखी एक संधी दिली जाईल. त्यासाठी परीक्षेची तारीखनंतर घोषित केली जाईल, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.