28 September 2020

News Flash

चंद्रग्रहणाचा पुरेपूर अनुभव घेण्याची संधी

मुंबईमध्ये सूर्य ज्यावेळेस मावळेल त्याच वेळेस पूर्व दिशेने चंद्राचा उदय होईल.

नेहरू तारांगण येथेही टेलिस्कोप लावण्यात येणार असून याचे थेट प्रक्षेपण करण्याची सुविधाही करण्यात येणार आहे.

मुंबईत विविध विज्ञानसंस्थांमध्ये विशेष व्यवस्था

खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्लुमून अशी तिहेरी खगोलीय पर्वणी कोणत्याही अडथळय़ाविना पाहण्याची अपूर्व संधी यंदा मुंबईकरांना लाभणार आहे. उंच इमारती वा झाडे यांच्यामुळे ही पर्वणी चुकू नये, याकरिता नेहरू विज्ञान केंद्रासह विविध विज्ञान संस्था तसेच खगोलप्रेमी संस्थांनी विशेष व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे, मुंबईकरांनीही मोठय़ा उत्साहाने या ठिकाणी पूर्वनोंदणी करून आपला सहभाग निश्चित केला आहे.

बुधवारी, ३१ जानेवारीला संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये घडणारा हा तिहेरी योग शहराच्या पूर्व दिशेने अधिक सुंदरपणे दिसणार आहे. मात्र मुंबईमध्ये असलेल्या उंचच उंच इमारतींमुळे सर्वच ठिकाणांहून हा नजराणा पाहता येणार नाही. तेव्हा मुंबईकरांना याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येण्यासाठी वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावरती दोन टेलिस्कोप उपलब्ध केले आहेत. या ठिकाणी खग्रास चंद्रग्रहण, सुपर मून आणि ब्लूमून या तिन्ही संकल्पना समजून घेण्यासाठी प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले, असे नेहरू विज्ञान केंद्राचे ग्रंथालय अधिकारी एस.एन बानी यांनी सांगितले.

नेहरू तारांगण येथेही टेलिस्कोप लावण्यात येणार असून याचे थेट प्रक्षेपण करण्याची सुविधाही करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईसह अन्य भागातील लोकांनाही मोबाइलवर हा नजराणा पाहता येणार असल्याचे नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी सांगितले आहे. नेहरू तारांगण हे पश्चिम बाजूला असल्याने इथल्यापेक्षाही नेहरू विज्ञान केंद्रामधून ते अधिक चांगल्या रीतीने दिसणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

मुंबईमध्ये सूर्य ज्यावेळेस मावळेल त्याच वेळेस पूर्व दिशेने चंद्राचा उदय होईल. याच कालावधीत ग्रहण चांगल्या रीतीने दिसणार आहे. मुंबईमध्ये पूर्वेकडे समुद्रकिनारा असल्याने मुंबईकरांना हा नजराणा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शहरातील उंचच उंच इमारती असल्याने हा अनोखा क्षण योग्य ठिकाणाहून पाहता यावा यासाठी आम्ही मागील महिनाभर जागेच्या शोधात होतो. अखेर कुलाबा येथे योग्य जागा मिळाली, असे स्पेस ग्रीक या खगोलशास्त्र प्रेमी गटातील चंद्रेश जैन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले आहे. या गटाच्या माध्यमातून कुलाबा येथे बे व्ह्य़िू कॅफेजवळ संध्याकाळी सहा ते नऊ या

वेळेत दोन टेलिस्कोप बसविले जाणार असून दुर्बिणींही उपलब्ध असणार असल्याचे जैन यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2018 2:44 am

Web Title: opportunity to experience total lunar eclipse
Next Stories
1 इर्ला नाल्याची वाट मोकळी होणार!
2 जुन्या प्रकल्पांची रखडपट्टी
3 ग्राहक प्रबोधन : विक्री अधिकार तपासा
Just Now!
X