‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’त सहभागी होण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत संधी
तरुण वक्त्यांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेसाठी अर्ज करण्याकरिता आता वक्त्यांना अधिक तीन दिवस मिळणार आहेत. या स्पर्धेचे अर्ज शुक्रवापर्यंत (१५ जानेवारी) भरता येणार आहेत. स्पर्धेची प्राथमिक फेरी १८ जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यामुळे वक्त्यांनो, आता तयारीला लागा..
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर आपले विचार मांडण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुणाईला ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या स्पर्धेच्या रूपाने ‘लोकसत्ता’ने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातील आणि १६ ते २४ या वयोगटातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत.  मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर अशा आठ केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे. ‘जनता बँक’ आणि ‘तन्वी हर्बल’ प्रायोजक असलेली ही स्पर्धा तीन टप्प्यांत घेण्यात येणार आहे.    सिंहगड इन्स्टिटय़ूट’, ‘मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस’, ‘इंडियन ऑईल’ यांच्या सहकार्याने स्पर्धा होत असून ‘युनिक अ‍ॅकॅडमी’ आणि ‘स्टडी सर्कल’ या स्पर्धेसाठी नॉलेज पार्टनर आहेत. स्पर्धेची प्राथमिक फेरी १८ ते २५ जानेवारीदरम्यान होणार आहे. प्राथमिक फेरीतून निवडण्यात आलेले वक्ते विभागीय अंतिम फेरीत दाखल होतील. ही फेरी २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. आठही विभागांतून निवडण्यात आलेल्या वक्त्यांची १४ फेब्रुवारी रोजी मुंबईत महाअंतिम फेरी रंगणार आहे. स्पर्धेचे अर्ज, सविस्तर वेळापत्रक आणि नियम ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

प्राथमिक फेरीचे विषय
* धर्म आणि दहशतवाद!
* इतिहास वर्तमानातला..
* यत्र नार्यस्तु पूज्यन्ते?
* बीईंग ‘सेल्फी’श
* मला कळलेली ‘नमो’निती!

* अर्ज करण्यासाठी मुदत
– १५ जानेवारी
* प्राथमिक फेरी
– १८ ते २५ जानेवारी
* विभागीय अंतिम फेरी
– २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी
* महाअंतिम फेरी
– १४ फेब्रुवारी
* अधिक माहिती आणि अर्ज – https://loksatta.com/vaktrutva-spardha