पर्यावरण दिनानिमित्त तब्बल दोन हजारांहून अधिक मासे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. विविध ठिकाणच्या १४० मत्स्यालयातील अ‍ॅरोवामा, अ‍ॅरोप्रीयामा, डेव्हिल फिश, अ‍ॅलिगेटर गार, स्टिंग रे, व्हीमल, मार्स फिश, स्टार फिश असे सुमारे चारशेहून अधिक प्रजातींचे मासे प्रदर्शनात पाहता येतील. हे प्रदर्शन ५ ते ९ जून दरम्यान खुले असणार आहे.

पेट लव्हर्स क्लब, मुंबई, ए-मार्ट आणि अ‍ॅक्वरिस्ट क्लब मुंबई, महाराष्ट्र पेट असोसिएशन आणि भवन्स नेचर अँड अ‍ॅडव्हेंचर सेंटर या संस्थांच्या सहयोगाने ‘वर्ल्ड ऑफ फिश’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. माशांच्या दुर्मीळ प्रजाती, समुद्रजीवन, इतर जलजीव अशा अनेक विषयांबाबत प्रदर्शनात माहिती देण्यात येईल.

फिश टँकची वाढती

लोकप्रियता पाहता त्याबद्दल घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिक पाहता येईल. भवन्स नेचर अँड अ‍ॅडव्हेंचर सेंटर, भवन्स कॉलेज कॅम्पस, अंधेरी (पश्चिम), मुंबई येथे ५ ते ९ जून दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत हे प्रदर्शन सशुल्क खुले राहणार आहे.