‘लोकसत्ता सेलिब्रेशन मोमेंट्स’ स्पर्धेतून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी

कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात ‘श्री गणेशा’ला वंदन करून केली जाते. म्हणून एखादे चांगले कार्य करताना त्याचा ‘श्री गणेशा’ केला, असे आपण सहज म्हणून जातो. एखाद्या समाजाभिमुख संकल्पाचा ‘श्री गणेशा’ करण्याकरिता गणेशोत्सवासारखा दुसरा मुहूर्त नाही. म्हणूनच ‘लोकसत्ता’ यंदा गणेशभक्तांकरिता ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘सेलिब्रेशन मोमेंट्स, २०१८’ घेऊन आला आहे. सामान्य गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. यातील विजेत्या गणेश भक्तांना आकर्षक बक्षिसे जिंकता येणार आहेत.

आपल्याकडे कुठल्याही कार्यात अग्रपूजेचा मान गणपतीला असतो. कार्य लग्नाचे असो वा मुंजीचे. विद्येच्या या देवतेचे अधिष्ठान अनेकांच्या वह्य़ा-पुस्तकांवर ‘श्री’च्या रूपानेही दिसून येते. श्री गणेशाचे हे महत्त्व अधोरेखित करण्याकरिता ‘लोकसत्ता’च्या वतीने ही स्पर्धा घेण्यात येत आहे.

कसे सहभागी व्हाल?

* ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता सेलिब्रेशन मोमेंट्स, २०१८’करिता भाविकांना त्यांच्या कुटुंबासमवेत गणेशोत्सव साजरा करतानाचे छायाचित्र पाठवायचे आहे.

* हे छायाचित्र loksattagums2018@gmail.com या संकेतस्थळावर स्वीकारले जाईल.

* या उत्सवादरम्यान सुरू केलेला समाजाभिमुख संकल्प किंवा कार्य यांची १५० शब्दात माहिती द्यायची आहे.

* स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव, घरचा पत्ता आणि मोबाईल नंबर आदी माहितीही पाठवायची आहे.

* या स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

* स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजेत्यांची छायाचित्रे ‘लोकसत्ता’त प्रकाशित होतील.