News Flash

मराठी प्राध्यापकावरील अन्याय अखेर दूर

‘मनसे नगरसेवकाच्या इमारतीतील महाविद्यालयातच मराठीची गळचेपी’ अशा शीर्षकाची बातमी लोकसत्तात

| September 15, 2013 05:11 am

‘मनसे नगरसेवकाच्या इमारतीतील महाविद्यालयातच मराठीची गळचेपी’ अशा शीर्षकाची बातमी लोकसत्तात प्रसिद्ध होताच मनसेच्या स्थानिक नेत्यांनी महाविद्यालयाचा सतत पाठपुरावा करून अखेर सहा महिन्यांनंतर येथील मराठी प्राध्यापकावर १६ वर्षे काम केल्यानंतर होणारा अन्याय दूर झाला व त्या प्राध्यापकाला त्याचा थकलेला पगार मिळाला.
या महाविद्यालयात अनेक कर्मचाऱ्यांशी अत्यंत अन्यायकारक वर्तणूक होत होती. हे सर्व कर्मचारी गेली १८ ते २२ वर्षे याच संस्थेत काम करत आहेत. उच्च न्यायालयाने ऑक्टो. २००० रोजी पाचवा वेतन आयोग लागू करण्याचा आदेश दिला होता. परंतु संस्थेने तो लागू केला नव्हता. शिक्षणक्षेत्रातील अनेक अधिकाऱ्यांना भेटूनही काहीही उपयोग झाला नव्हता. त्यामुळेच संस्थाचालक रजनीकांत शहा व प्राचार्य दिनेशचंद्र तिवारी यांची दडपशाही सुरूच होती. १६ वर्षे काम करणाऱ्या मराठी प्राध्यापकाला अर्धवेळ करून पगारही अर्धा केल्यानंतर या प्राध्यापकाने ‘लोकसत्ता’चे दार ठोठावले. ‘लोकसत्ता’त आलेल्या वृत्ताचा पाठपुरावा करून मनसेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरील अन्याय दूर केला.  या व्यतिरिक्त अपुरे, अनियमित वेतन तसेच कारभाराबद्दल दादागिरी या सर्व प्रश्नांसंदर्भात एप्रिलपासून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आज हे प्रश्न सुटल्याचे मनसेचे नगरसेवक प्राजक्त पोतदार, शहर प्रमुख समीर पालांडे, शहर अध्यक्ष व सभापती राजेश कदम यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 5:11 am

Web Title: oppression of marathi profesor eventually removed
Next Stories
1 हसन अलीचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला
2 एचआयव्हीग्रस्त कर्मचाऱ्याला पुन्हा नोकरी बहाल
3 वाडय़ात वादळी वाऱ्यामुळे शेकडो झाडे पडली
Just Now!
X