25 September 2020

News Flash

अवयवदानामुळे चार जणांना जीवदान

हृदय नवी मुंबईतून चार तासांत चेन्नईला

हृदय नवी मुंबईतून चार तासांत चेन्नईला

खालापूर येथील एका महिलेने पतीच्या निधनानंतर त्याचे अवयवदान केल्यामुळे चार रुग्णांना जीवदान मिळाले. त्याचे हृदय नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयातून थेट चेन्नई येथील ग्लोबल रुग्णालयात विमानाने चार तासांत पोहोचविण्यात आले.

खालापूर येथील एका खासगी कारखान्यात टेक्निशयन म्हणून काम करणाऱ्या अजय खैनूर या ३३ वर्षीय तरुणाला अपघात झाला. त्याच्या मेंदूला सूज आल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. खालापूर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला अत्यवस्थ स्थितीत नवी मुंबई बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. तेथेही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.

अवयवदानाबाबत माहिती असलेल्या त्याच्या पत्नीने त्याचे यकृत, दोन्ही मूत्रपिंडे आणि हृदय दान करण्याचा निर्णय घेतला. त्यातील एक मूत्रपिंड वाशी येथील फोर्टिज रुग्णालयातील रुग्णाला दान करण्यात आले, तर दुसरे मुत्रपिंड आणि यकृत अपोलो रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आले. हृदयदानासाठी मुंबईत रुग्ण न मिळाल्याने चेन्नई येथील ग्लोबल रुग्णालयातील एका रुग्णासाठी हे हृदय चार तासांत पोहचविण्यात आले. नवी मुंबई ते मुंबई विमानतळ हे ३८ किलोमीटरचे अंतर ४० मिनिटांत पार करून हे हदय विमानतळावर नेण्यात आल्याचे अपोलो रुग्णालयातून सांगण्यात आले. खैनूर यांच्या अवयवदानामुळे चार रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

  • एक मूत्रपिंड वाशी येथील फोर्टिज रुग्णालयातील रुग्णाला दान करण्यात आले.
  • दुसरे मुत्रपिंड आणि यकृत अपोलो रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2019 1:15 am

Web Title: organ donation heart transplant surgery mpg 94
Next Stories
1 निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक
2 वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालयांत संगणक प्रणालीचा बोजवारा!
3 मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून कर्णबधिर मुलांना श्रवणशक्ती
Just Now!
X