News Flash

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन तरुणांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन तरुणांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. अटक तरुणांपैकी एक मुलीचा मित्र असून त्यानेच घरी कोणी नसताना तिला घरी बोलावले होते. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शोध घेत दोन्ही तरुणांना अटक केली.
ओशिवराच्या आनंद नगर भागात पीडित १५ वर्षीय मुलगी आपल्या आईवडिलांसह राहते. रविवारी सायंकाळी ती कुटुंबीयांसोबत बाहेर गेली होती. त्यावेळी तिचा मित्र सलमान नौशाद (२२) याने तिला फोन केला. आपण कुटुंबीयांसोबत बाहेर असून येण्यास वेळ लागेल असे मुलीने नौशादला सांगितले.
यावर नौशादने तिला काहीही करून मित्र जावेदच्या घरी भेटण्यास ये, अशी गळ घातली. मुलगी आईवडिलांना घरी जाते, असे सांगून निघाली आणि नौशादचा मित्र जावेद हुसेन (२३) याच्या घरी गेली. मुलगी घरी आल्यानंतर नौशाद आणि जावेदने मुलीवर जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, मुलीचे आईवडील घरी आले असता मुलगी घरी परतली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही वेळानंतर घरी मुलगी आल्यानंतर तिची आईवडिलांनी चौकशी केली. परंतु, समाधानकारक उत्तरे देत नसल्याने कुटुंबीयांनी तिला आणखी खोलात जाऊन विचारले. त्यावेळी जावेदच्या घरी घडलेला सर्व प्रकार तिने पालकांना सांगितला. हादरलेल्या पालकांनी तातडीने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास करत नौशाद आणि जावेद यांना सोमवारी अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2016 2:41 am

Web Title: oshiwara police arrest youth for raping minor
Next Stories
1 लेप्टो रोखण्यासाठी तबेल्यांच्या मालकांना नोटीस
2 मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदांना संरक्षण
3 मुंब्रा-ठाणेदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Just Now!
X