सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणाची सुनावणी करणारे सीबीआयचे विशेष न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्या मुलाने एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. न्यायाधीश बी.एच. लोया यांचा मुलगा अनुज आणि त्यांच्या वकिलांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी अनुज लोया याने वडिलांच्या मृत्यूबाबत आमचा कुणावरही संशय नसल्याचे सांगितले. त्यामुळे कृपया मला आणि आमच्या कुटुंबीयांना या प्रकरणात ओढू नका, अशी विनंतीही त्याने केली.

काही एनजीओ आणि वकिलांनी या प्रकरणावरून आमचा पिच्छा पुरवला आहे. माझ्या कुटुंबाला या सर्व परिस्थितीचा त्रास होतोय. सुरूवातीला वडिलांच्या मृत्यूबाबत संशय वाटला होता. मात्र, नंतर सर्व स्पष्ट झाले. त्यामुळे आम्ही क्लिअर आहोत. आमचा कुणावरही संशय नाही, या प्रकरणात कृपया आम्हाला ओढू नका, असे अनुजने म्हटले.

‘न्यायमूर्ती बृजमोहन लोया रविभवनात थांबलेच नव्हते’

हराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज, शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे न्या. बी.एच. लोया यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल मागितला आहे. तसंच हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचंही न्यायालयाने म्हटलs आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. एका सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरला गेलेले लोया यांचे १ डिसेंबर २०१४ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूच्या वेळची परिस्थिती आणि त्याचा सोहराबुद्दीन प्रकरणाशी असलेला संबंध याबाबत लोया यांच्या कुटुंबीयानी संशय व्यक्त केल्याचे वृत्त माध्यमांनी दिल्यानंतर हा मुद्दा गेल्या नोव्हेंबरमधे प्रकाशात आला होता. महाराष्ट्रातील पत्रकार बी.आर. लोणे यांची याचिका विचारार्थ घेऊन सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए.एम. खानविलकर, डी.वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने सुनावणी घेण्याचे ठरविले आहे.