News Flash

बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात तपासणीसाठी बाह्यरुग्ण विभाग

तपासणी सुविधा उपलब्ध नसली तरी येथील संशयित रुग्णांचे नमुने कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील.

 

मुंबई : बाधित देशातून आलेल्या आणि करोनाची लक्षणे असलेल्या प्रवाशांसाठी आता कस्तुरबापाठोपाठ जोगश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवा आणि विलगीकरण कक्ष कार्यरत झाले आहेत.

कस्तुरबामध्ये सुरू केलेल्या बाह्यरुग्ण  विभागात दरदिवशी लागणाऱ्या रांगा लक्षात घेऊन ही सेवा विकेंद्रित केली आहे. जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात बाह्यरुग्ण  सेवा बुधवारपासून सुरू होणार आहे. येथे २० खाटांचा विलगीकरण कक्षही सुरू केलेला आहे.

तपासणी सुविधा उपलब्ध नसली तरी येथील संशयित रुग्णांचे नमुने कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. तेव्हा या भागातील प्रवाशांनी ट्रॉमा केअर रुग्णालयातील बाह्यरुग्ण  विभागात तपासणीसाठी जावे, असे पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.दक्षा शाह यांनी सांगितले.

ज्या प्रवाशांना पालिकेच्या रुग्णालयांमध्ये जाण्यास हरकत आहे, अशा प्रवाशांसाठी विमानतळाजवळच चार खासगी हॉटेलमध्ये अलग राहण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ही सुविधा मोफत नसून मात्र प्रवाशांना याचा खर्च द्यावा लागेल. सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टर दररोज यांची तपासणी करणार आहे.

खासगी रुग्णालयांमध्येही सुविधा उपलब्ध

पालिकेच्या रुग्णालयांव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमध्येही उपचार उपलब्ध झाले आहेत. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात सध्या सेवा उपलब्ध आहेत. येथे १५ खाटांचा विलगीकरण कक्ष सुरू झाला असून अन्य काही खासगी रुग्णालये लवकरच ही सेवा सुरू करतील, असे डॉ.दक्षा शाह यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 1:13 am

Web Title: outpatient department for examination at balasaheb thackeray hospital akp 94
Next Stories
1 पालिका कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे
2 करोनाचा प्रसार प्राण्यांमुळे नाही!
3 प्रवासी घटल्याने बेस्टला फटका
Just Now!
X