मुंबईत काल पावसाने अक्षरशा थैमान घातलं. तीन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडली. चेंबूर भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला, तर विक्रोळीतही ३ लोकांचा मृत्यू झाला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची आज पाहणी केली. ”ही एक नैसर्गिक घटना जरी असली, तरी एवढा पाऊस पडणं अनैसर्गिक आहे. मुंबईत काल रात्री झालेला पाऊस भितीदायक होता. समुद्र किनाऱ्यावरील भागांना धोका जास्त आहे.”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

काळरात्र! चेंबूरमध्ये दरड कोसळून १७ ठार; तर विक्रोळीत दुमजली इमारत कोसळली, ६ जणांचा मृत्यू

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

चेंबूर नंतर विक्रोळीतील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी सांगितले की, तीन ठिकाणी काल दरडी कोसळल्या आहेत. आपण सर्वांनीच पाहिलं की काल कशाप्रकारे पाऊस झाला. अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण २०० मिमी पेक्षा जास्त होतं. विक्रोळीत दुर्घटना घडली त्या ठिकाणी एक-दोन वर्षांपूर्वी जी संरक्षक भिंत उभारण्यात आली होती, त्यामुळे कमी नुकसान झालं आहे. मात्र दुर्घटना तर घडलीच आहे. सरकारकडून नुकसानग्रस्ताना सर्वोतोपरी मदत पुरवली जात आहे.

तसेच, ही घटना एक नैसर्गिक आपत्ती होती. भिंतीच्यावरून माती आणि पाणी आले. भिंत आरसीसीने बनविली होती परंतु पाण्याचे जोर काही थांबवू शकली नाही. आम्ही मुंबईतील बेकायदेशीर घरं आहेत, त्यांचा आढावा घेतला जात आहे. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. अशी देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी माहिती दिली.

तर, धोकादायक परिस्थितीत राहणाऱ्या लोकांना तत्काळ अन्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा आम्ही निणर्य घेऊ. बीएमसी कडून या दुर्घटनेची चौकशी केली जाईल. अशी माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक; मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर!

मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. पालिका आयुक्तांकडून मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली असून जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत.