News Flash

हार्बर रेल्वे विस्कळीत, खांदेश्वरजवळ ओव्हरहेड वायर तुटली

ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल सेवेचा खोळंबा

(संग्रहित छायाचित्र)

खांदेश्वर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत झाली आहे. मागील अर्ध्या तासापासून लोकल एकाच ठिकाणी उभी आहे असेही समजते आहे. आता ओव्हरहेड वायर दुरुस्त होणार नाही तोपर्यंत ही सेवा विस्कळीतच रहाणार आहे अशीच चिन्हं आहेत. मुंबई ट्रेन अपडेट्स या फेसबुक ग्रुपवरही यासंदर्भातले अपडेट्स पोस्ट करण्यात येत आहेत. आता ही लोकल कधी जागची हलणार या प्रतीक्षेत प्रवासी आहेत. पनवेलकडून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने येणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 5:34 pm

Web Title: over head wire cut at khandeshwar station
Next Stories
1 अंधेरीत मरोळमध्ये रहिवाशी सोसायटीत बिबटया शिरल्याने खळबळ
2 १.८० कोटी रुपयांना दाऊदची बहिण हसीनाच्या मुंबईतील फ्लॅटचा लिलाव
3 डाऊन प्रवास करणाऱ्यांनो सावधान, होऊ शकतो दंड आणि एक वर्ष कारावासाची शिक्षा
Just Now!
X