News Flash

बारावीच्या शेकडो विद्यार्थ्यांवर आयत्यावेळी विषय बदलण्याची वेळ

बदललेल्या नियमाकडे कनिष्ठ महाविद्यालयांचे दुर्लक्ष

बदललेल्या नियमाकडे कनिष्ठ महाविद्यालयांचे दुर्लक्ष

मुंबई : गेल्यावर्षी बदलण्यात आलेला नियम कनिष्ठ महाविद्यालयांनीही समजून घेतला नाही आणि राज्य मंडळानेही सर्व महाविद्यालयांपर्यंत बदललेले नियम पोहोचले आहेत का हे पाहण्याची तसदी घेतली नाही. मात्र, त्यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांसमोर पेच निर्माण झाला असून त्यांना परीक्षेच्या तोंडावर विषय बदलण्याची वेळ आली आहे.

शासनाने ८ ऑगस्ट २०१९ रोजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विषय रचनेत काही बदल केले. असलेल्या विषयांचे ‘अ’ , ‘ब’ आणि ‘क’ अशा तीन गटांत वर्गीकरण केले. त्यातील ब आणि क गटातील काहीच विषय घेता येतील असा निर्णय राज्यमंडळाने जाहीर केला. शिक्षणशास्त्र, सहकार, संरक्षण शास्त्र, इंग्रजी साहित्य, टंकलेखन व लघुलेखन असे काही विषय परीक्षेतून वगळण्यात आले. गेल्यावर्षी जाहीर झालेल्या निर्णयाची काही शाळा, महाविद्यालयांना कल्पनाच नव्हती. राज्यमंडळानेही सर्व महाविद्यालयांपर्यंत माहिती पोहोचली आहे का याची खातरजमा केली नाही. त्यामुळे आता परीक्षेच्या तोंडावर शेकडो विद्यार्थ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. वगळलेले विषय परीक्षा अर्जात नसल्यामुळे आता अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. दोन वर्षे शिकलेले विषय आता परीक्षेला न घेता दुसऱ्याच विषयांची तयारी करून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे.

यंदा या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू द्यावे, अशी मागणी मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 1:57 am

Web Title: over hundred of hsc students suddenly change the subject ahead of exam zws 70
Next Stories
1 Coronavirus : मुंबईत दिवसभरात ६५६ जणांना करोना संसर्ग
2 अमली पदार्थविक्री प्रकरणी ब्रिटिश नागरिकाला अटक
3 पालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी २० कोटींच्या मुखपट्टय़ांची खरेदी
Just Now!
X