करोना संसर्गावर मात करून मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्तासह १९१ अधिकारी, अंमलदार कर्तव्यावर रुजू झाले. या सर्वाचे पोलीस दलात स्वागत के ले गेले. पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनीही त्यांची पाठ कौतुकाने थोपटली. राज्य पोलीस दलातील १३२८ पोलिसांना करोना संसर्गाची लागण झाली. त्यातील ६१८ अधिकारी, अंमलदार मुंबई पोलीस दलातील आहेत.

मुंबईतील महापुरासह (२६ जुलै) २६/११चा अतिरेकी हल्ला अनुभवणारे, या प्रसंगांत न खचता कर्तव्य चोख पार पडणाऱ्या अधिकारी, अंमलदारांचे मनोबल कधीच कमी होऊ शकणार नाही. तीच जीद्द करोनावर मात करण्यासाठी कामी येत आहे, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

स्वतंत्र रुग्णवाहिकांची मागणी

करोनाची लागण झालेल्या पोलिसांना रुग्णालयात नेण्यासाठी किमान १२ स्वतंत्र रुग्णवाहिका पुरवाव्यात, अशी मागणी सह पोलीस आयुक्त(प्रशासन) नवल बजाज यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.