मुंबई : महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांची गरज लक्षात घेऊन अन्य राज्यांकडून प्राणवायू घेण्यात येत आहे. महाराष्ट्रात जलदगतीने प्राणवायू दाखल व्हावा यासाठी त्याच्या टँकरची रेल्वेने वाहतूक करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात रेल्वे मार्गाने टँकरमधून २३० मेट्रिक टन प्राणवायू आणण्यात आला आहे.

राज्यातील वैद्यकीय प्राणवायूचा तुटवडा भरून काढण्यासाठी रेल्वेमार्फत प्राणवायू एक्स्प्रेस चालवली जात आहे. विशाखापट्टणम येथून प्राणवायू आणण्यासाठी कळंबोलीमधून प्राणवायू एक्स्प्रेस चालवण्यात आली होती. सात टँकरमध्ये १२६ मेट्रिक टन प्राणवायू घेऊन एक्स्प्रेस २३ एप्रिलला नागपूर येथे दाखल झाली. नागपूरला ३, तर नाशिकला २४ एप्रिलला चार टँकर पोहोचले. त्यानंतर हापा ते कळंबोलीसाठी ३ टँकरमधून ४८ मेट्रिक टन प्राणवायूची वाहतूक के ली. ही एक्स्प्रेस २६ एप्रिलला दाखल झाल्यानंतर शुक्र वारी अंगुल ते नागपूरसाठी ४ टँकरमधून ५६.३० मेट्रिक टन प्राणवायू घेऊन एक्स्प्रेस निघाली. ही एक्स्प्रेस नागपूरला शनिवारी पहाटे ४ वाजेपर्यंत पोहोचली.