News Flash

चित्रकार सुहास बहुळकर यांच्या पुस्तकाला यंदाचे केशवराव कोठावळे पारितोषिक

प्रा. प्रतिभा कणेकर, संजीवनी खेर, चंद्रकांत भोंजाळ यांच्या निवड समितीने पारितोषिकासाठी या पुस्तकाची निवड केली आहे.

चित्रकार सुहास बहुळकर

मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या ‘केशवराव कोठावळे’ पारितोषिकासाठी ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या ‘बॉम्बे स्कूल- आठवणीतले, अनुभवलेले’ या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. १५ हजार १५१ रुपये आणि मानचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

प्रा. प्रतिभा कणेकर, संजीवनी खेर, चंद्रकांत भोंजाळ यांच्या निवड समितीने पारितोषिकासाठी या पुस्तकाची निवड केली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून बहुळकर यांनी एका कला संस्थेचे इतिहास प्रथमच वाचकांसमोर आणला आहे. व्यक्तिचित्रांच्या अंगाने लिहिलेला हा आत्मनिष्ठ इतिहास दर्जेदार ललितलेखन वाचल्याचा अनुभव देतो, अशा शब्दात निवड समितीने या पुस्तकाचा गौरव केला आहे.

बहुळकर यांनी लिहिलेले हे पुस्तक ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केले आहे. येत्या २८ मे रोजी होणाऱ्या विशेष कार्यक्रमात बहुळकर यांना हे पारितोषिक प्रदान केले जाणार असल्याचे पारितोषिक समितीचे निमंत्रक अशोक कोठावळे यांनी जाहीर केले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 1:17 am

Web Title: painter suhas bahulkar get keshavrao kothawale award
Next Stories
1 मोडी लिपीतील एक लाख कागदपत्रे दरवर्षी ‘मोडीत’!
2 ‘सणसणीत श्रीमुखात..’ अग्रलेखावर मत नोंदवा
3 ‘अ‍ॅप’ आधारित बसमधून विनापरवाना वाहतूक
Just Now!
X