News Flash

पालघर जिल्हा पर्यटन केंद्र विकसित करणार – मुख्यमंत्री

पालघर जिल्ह्य़ाला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे या जिल्ह्य़ाचा विकास पर्यटनस्थळाच्या धर्तीवर केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी नव्या जिल्ह्य़ाच्या शुभारंभप्रसंगी काढले.

| August 2, 2014 03:34 am

पालघर जिल्ह्य़ाला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे या जिल्ह्य़ाचा विकास पर्यटनस्थळाच्या धर्तीवर केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी नव्या जिल्ह्य़ाच्या शुभारंभप्रसंगी काढले. या जिल्ह्य़ातील सर्वच तालुके सहा पदरी रस्त्यांनी जोडण्यात येतील. त्यामुळे येथे औद्योगिकरणास चालना मिळून नवे उद्योग येतील आणि जिल्ह्य़ातील युवकांना रोजगार मिळेल, असेही ते म्हणाले. पर्यटन आणि औद्योगिकरणाचा समन्वय साधण्याचा प्रयत्नही केला जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून नवीन पालघर जिल्ह्य़ाची निमिर्ती करण्यात आली असून राज्यातील हा ३६ वा जिल्हा आहे. या जिल्ह्य़ाचे शुभारंभप्रसंगी ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक, विधानसभेचे उपसभापती वसंत डावखरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच आदीवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत उपस्थित होते. अथांग असा समुद्रकिनारा लाभलेल्या मोजक्या जिल्ह्य़ांपैकी पालघर हा एक आहे. या जिल्ह्य़ातील फलोत्पादन लक्षणीय असून निसर्गसंपत्तीने नटलेल्या या जिल्ह्य़ात पर्यटन विकासाला भरपूर वाव आहे. त्यामुळे नव्या जिल्ह्य़ाची निर्मीती होत असताना या भागात भविष्यात रेखीव असे पर्यटन केंद्र उभे राहावे, यासाठी भविष्यात पाउले उचलण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
आंदोलनाचे गालबोट
नव्या जिल्ह्य़ाचे मुख्यालय जव्हार असावे, अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. आमदार विवेक पंडीत यांच्या श्रमजीवी संघटनेमार्फत यावेळी मुख्यमंत्र्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्नही करण्यात आला. जव्हार तालुक्यातील आदीवासी विद्यार्थ्यांसाठी असलेले डिएड महाविद्यालय बदलापूर येथे स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यास विद्यार्थ्यांचा विरोध आहे.  याच पाश्र्वभूमीवर राजेंद्र गावीत यांनी श्रमजिवी संघटनेला पालघर जिल्हा उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री सभेच्या ठिकाणी निघाल्यामुळे श्रमजिवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला.  या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 3:34 am

Web Title: palghar district to be tourist place development cm prithviraj singh
Next Stories
1 धनगर समाजाची सरकारला २४ तासांची मुदत!
2 दीपक केसरकरांचा आमदराकीचा राजीनामा; ५ ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश
3 ‘मुंबई मेट्रो’साठीही मासिक पासची सुविधा
Just Now!
X