25 September 2020

News Flash

उमरोळीत संतप्त प्रवाशांचा रेलरोको

पालघरमधील उमरोळी येथे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला असून बुधवारी सकाळी स्थानिकांनी 'रेल रोको' आंदोलन केले. मंगळवारपासून उमरोळी स्थानकामध्ये गाड्या न थांबवल्याने स्थानिक प्रवासी रुळावर उतरले.

संग्रहित छायाचित्र

पालघरमधील उमरोळी येथे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला असून बुधवारी सकाळी स्थानिकांनी ‘रेल रोको’ केला. मंगळवारपासून उमरोळी स्थानकामध्ये गाड्या न थांबवल्याने स्थानिक प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले.

उमरोळी स्थानकात गेल्या २४ तासांपासून लोकल ट्रेन पोहोचलेली नाही. त्यामुळे एक्स्प्रेस गाड्यांना थांबा द्यावा, अशी स्थानिकांची मागणी होती. बुधवारी सकाळी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त प्रवाशांना रेल्वे रुळांवर उतरून तिथून जाणारी एक एक्स्प्रेस रोखून धरली. अखेर एक्स्प्रेसला थांबा देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिल्यानंतर रेल रोको मागे घेण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 9:58 am

Web Title: palghar western railway umroli station rail roko
Next Stories
1 डोंबिवलीत दोन तरुण नाल्यात वाहून गेले, शोध सुरु
2 वसई तुंबण्यास कारण की..
3 वीजपुरवठा खंडित
Just Now!
X