धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही म्हणणाऱ्या भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी घूमजाव केले आहे. त्यांना दोन दिवसपण सत्तेपासून दूर राहता येत नाही. पंकजा मुंडे यांचा हा खेळ सत्तेसाठी आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
महाराष्ट्राच्या मंत्री पंकजा मुंडे या दोन दिवसापूर्वी धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही असे सांगत होत्या आणि आता त्यांनी घूमजाव केले. याचाच अर्थ हा की पंकजा मुंडे या दोन दिवसही सत्तेशिवाय राहू शकत नाहीत हे स्पष्ट आहे. राज्यात जेव्हा कधी निवडणुका होतील त्यावेळी लोकसभेत आणि विधानसभेत भाजपाला धनगर समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 8, 2019 6:53 pm