महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील चिक्की घोटाळ्याच्या आरोपाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी करावी, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे खाद्यपदार्थ, चटई आणि पुस्तकांच्या खरेदीच्या नियमांचे उल्लंघन करत २०६ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप  झाला आहे, असा आरोप करून त्याची एसीबीमार्फत चौकशीची मागणी हेमंत पाटील यांनी याचिकेद्वारे केली आहे. एवढेच नव्हे तर गरज भासल्यास संबंधित विभागाच्या मंत्र्यावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान पंकजा यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय समाज पक्षाने सोमवारी राज्यात आंदोलन केले.