19 September 2020

News Flash

पंकजा मुंडे यांचा भाजपच्या राज्यातील कोअर समितीत समावेश

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे-पालवे यांना भारतीय जनता पक्षाच्या राज्य कोअर समितीमध्ये घेण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला.

| June 19, 2014 03:16 am

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे-पालवे यांना भारतीय जनता पक्षाच्या राज्य कोअर समितीमध्ये घेण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. मुंडे या समितीचे सदस्य होते. त्यांच्या पश्चात पहिल्यांदाच समितीची बैठक मुंबईत झाली. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि अन्य नेते उपस्थित होते. बैठकीत पंकजा मुंडे यांना कोअर समितीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्य
पंकजा मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद देण्याची बीडवासियांची भावना आहे. त्यांची ही भावना केंद्रीय नेतृत्त्वापर्यंत पोहोचविण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे तावडे यांनी या बैठकीनंतर सांगितले. बीडमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षातर्फे कोणाला उभे केले जाणार, याबाबत अद्याप काही ठरलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 3:16 am

Web Title: pankaja munde will be inducted in bjps state core committee
Next Stories
1 सिंचनाचे क्षेत्र वाढले ; चितळे समितीचा निर्वाळा
2 आघाडीत शक्तीचे प्रयोग
3 बडय़ा कंपन्यांसाठी ‘मिहान’च्या पायघडय़ा!
Just Now!
X