04 March 2021

News Flash

‘परळचा राजा’ मंडळाकडून रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी जेवणाची सोय

मुसळधार पावसामुळे अनेकजण रेल्वे स्थानकात अडकले

मुंबईमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेनची वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळपासूनच कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबईमधील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे अनेक मुंबईकर वेगवेगळ्या स्थानकांमध्ये अडकून पडले आहेत. याच अडकलेल्या मुंबईकरांनाच्या मदतीसाठी गणेश मंडळे धावून आली आहे. परळचा राजा नरेपार्क मंडळाने अडकलेल्या मुंबईकरांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केली आहे. मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ पाटकर यांच्या नावाने यासंदर्भातील मेसेज व्हायरल झाला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवासी अडकून पडले आहेत. दादर, परळ, माटुंगा स्थानकातही मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकले आहेत. या प्रवाशांच्या मदतीसाठी ‘परळचा राजा नरेपार्क’ मंडळाकडून जेवणाची सोय केलेली आहे. मुंबईकरांनी कुठलीही तमा न बाळगता परळ चा राजा नरेपार्क गणपती मंडपाजवळ संपर्क करावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ पाटकर यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 8:27 pm

Web Title: paral cha raja ganpati mandal offers food for people stranded in mumbai due to rain scsg 91
Next Stories
1 VIDEO: घाटकोपर स्थानकामध्ये चेंगराचेंगरी
2 मुसळधार पावसामुळे मुंबईकर त्रस्त, रेल्वेमंत्री गणपती दर्शनात व्यस्त
3 आरेमधील वृक्षतोडीला राज ठाकरे व लता मंगेशकरांचाही विरोध
Just Now!
X