Parel Crystal Tower Fire: परळमधील क्रिस्टल टॉवरमध्ये आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली असून टॉवरच्या १२ व्या मजल्यावर ही आग लागली. जवळपास दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. इमारतीत अडकलेल्या १० ते १२ जणांची सुटका करण्यात आली असून आग नेमकी कशामुळे लागली हे अजूनही समजू शकलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परळमधील क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्यावर बुधवारी सकाळी साडे आठच्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा स्थानिकांचा दावा आहे. पण याबाबत अग्निशमन दलाने दुजोरा दिलेला नाही. तपासानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अग्निशमन दलाचे १० हून अधिक बंब घटनास्थळी पोहोचले आहेत.घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

Live Blog

Highlights

    12:22 (IST)22 Aug 2018
    जखमींची नावे

    क्रिस्टल टॉवरमधील आगीत जखमी झालेल्यांची नावे खालील प्रमाणे. एकूण १६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असून यात १० पुरुष व ६ महिलांचा समावेश आहे. 

    12:18 (IST)22 Aug 2018
    दोन मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही

    क्रिस्टल टॉवरमधील आगीत मृत्यू झालेल्या चार पैकी दोघांची ओळख पटली आहे. बबलू शेख (वय ३६) आणि शुभदा शेळके (वय ६२) अशी त्यांची नावे असून उर्वरित दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही. 

    12:08 (IST)22 Aug 2018
    ...तर संबंधितांवर कारवाई: महापौर

    १२ व्या आणि १३ व्या मजल्यावर आग लागली. इमारतीत नियमाचे उल्लंघन झाले असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. जखमींना तातडीने उपचार मिळावे यास प्राधान्य देणार : महापौर 

    11:36 (IST)22 Aug 2018
    मृतांचा आकडा चारवर

    क्रिस्टल इमारतीतील आगीत एकूण १६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा ४ वर

    11:05 (IST)22 Aug 2018
    दोन रहिवाशांचा मृत्यू

    क्रिस्टल टॉवरमधील आगीत दोन रहिवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त. धूरात गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती. मृतांमध्ये एक वृद्ध महिला व पुरुषाचा समावेश

    10:36 (IST)22 Aug 2018
    दोन तासानंतर आगीवर नियंत्रण

    जवळपास दोन तासानंतर क्रिस्टल टॉवरमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून अग्निशमन दलाच्या पथकाने आग लागलेल्या मजल्यावर प्रवेश केला आहे. मजल्यावर आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

    10:30 (IST)22 Aug 2018
    ८ जणांना केईएम रुग्णालयात भरती केले

    इमारतीतून बाहेर काढलेल्या आठ जणांना धूराचा त्रास झाल्याने त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. (छाया सौजन्य: सायली पाटील) 

    10:24 (IST)22 Aug 2018
    वाऱ्यामुळे आग विझवताना अडथळे

    आगीचा सर्वाधिक फटका इमारतीच्या १२ व्या, १३ व्या आणि १४ व्या मजल्याला बसला असून वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अडथळे येत आहे.  

    10:21 (IST)22 Aug 2018
    अद्याप जीवितहानी नाही : अग्निशमन विभाग

    इमारतीत अडकलेल्या १० ते १२ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले असून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

    10:19 (IST)22 Aug 2018
    घटनास्थळी बचावकार्य सुरू

    अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे.

    10:16 (IST)22 Aug 2018
    क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्यावर आग

    परळमधील हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्यावर आग लागली.

    हिंदमाता परिसरात क्रिस्टल टॉवर ही १७ मजली इमारत असून ही निवासी इमारत आहे. इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आग लागली असून जिन्यांवर धूर असल्याने बाहेर पडण्यात अडथळे येत आहेत.
    Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: Paral fire breaks out at crystal tower fire tender at spot
    First published on: 22-08-2018 at 09:05 IST