प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली गाडी आढळल्याच्या प्रकरणातील तपासात काही गंभीर चुका पोलिसांकडून झाल्याने आणि या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी परमबीर सिंह यांची पोलीस आयुक्तपदावरून बदली केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल.  कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असे देशमुख यांनी सांगितले.

आम्ही घाबरत नाही : अनिल परब</strong>

पोलीस अधिकारी सचिन वाझे हे निलंबित असताना त्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव होता या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला उत्तर देताना कोणाचीही चौकशी करा, आम्ही घाबरत नाही, असे आव्हान परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले आहे. कोणाचीही चौकशी करावी, कु ठल्याही चौकशीला सामोेरे जायला आम्ही घाबरत नाही, असे परब म्हणाले.