Elphinstone Station Stampede मुंबईतील परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये २२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३३ प्रवासी जखमी झाले आहेत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी पुलावर आल्याने ही दुर्घटना घडली आहे. चेंगराचेंगरी वाढल्याने अनेकांचा श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे काहीजण बेशुद्ध पडले.

सकाळी १० च्या सुमारास एल्फिन्स्टन स्टेशनवरील पुलावर हा प्रकार घडला. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये १३ पुरुष, ८ महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. या दुर्घटनेत ३३ जण जखमी झाले असून यामध्ये २४ पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी केईएम आणि वाडिया रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. याशिवाय डॉक्टरांचे पथकदेखील घटनास्थळी पोहोचले आहे. अतिशय अरुंद असलेला पूल, त्यातच आलेला पाऊस यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकावरील दोन्ही ट्रॅकवर एकाच वेळी ट्रेन आल्याने मोठी गर्दी उसळली. याचवेळी पाऊस सुरु असल्याने रेल्वे पुलावर क्षमतेपेक्षा अधिक लोक जमा झाले. यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला आणि सर्वांनी पुलावरुन उतरण्याचा प्रयत्न सुरु केला. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींचा आकडा जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुर्घटनेतील मृतांची नावे

मुकेश मिश्रा

सचिन कदम

मयुरेश हळदणकर

अंकुश जैस्वाल

सुरेश जैस्वाल

ज्योतिबा चव्हाण

रोहित परब

अॅलेक्स कुरिया

हिलोनी देढीया

चंदन गणेश सिंह

मोहम्मद शकील

मसूद आलम

शुभलता शेट्टी

सुजाता शेट्टी

श्रद्धा वरपे

मीना वरुणकर

तेरेसा फर्नांडिस