परळ-एल्फिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीतील २२ मृतांपैकी १७ मृतांची ओळख पटली आहे. पाच मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या दुर्घटनेत ३३ प्रवासी जखमी झाले असून त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. सकाळी १० च्या सुमारास एल्फिन्स्टन स्टेशनवरील पुलावर हा प्रकार घडला. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये १३ पुरुष, ८ महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. या दुर्घटनेत ३३ जण जखमी झाले असून यामध्ये २४ पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी केईएम आणि वाडिया रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटनेतील मृतांची नावे

मुकेश मिश्रा

सचिन कदम

मयुरेश हळदणकर

अंकुश जैस्वाल

सुरेश जैस्वाल

ज्योतिबा चव्हाण

रोहित परब

अॅलेक्स कुरिया

हिलोनी देढीया

चंदन गणेश सिंह

मोहम्मद शकील

मसूद आलम

शुभलता शेट्टी

सुजाता शेट्टी

श्रद्धा वरपे

मीना वरुणकर

तेरेसा फर्नांडिस