करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नेरपार्कने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदा मंडळाने २३ फुटी भव्य गणेशमुर्ती न साकरता फक्त तीन फुटाची छोटी मुर्ती घडवण्याचा निर्णय घेतला आहे.

परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नेरपार्कचा गणपती परळचा राजा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी २३ फुटापर्यंत भव्य आकर्षक गणेशमुर्ती मंडळाकडून साकारण्यात येते. पण करोना संकट, आर्थिक मंदी या पार्श्वभूमीवर मंडळाने गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

E bus service started on behalf of State Transport Corporation during Chaitrotsav nashik
नाशिक-सप्तश्रृंग गड ई बससेवा
bchchu kad
“आमची लढाई हुकूमशाहीविरोधात”, बच्चू कडूंचा नवनीत राणा आणि भाजपाला टोला; म्हणाले, “त्यांची बनवाबनवी…”
Violation of Model Code of Conduct by Municipal Commissioner Vipin Paliwal
मनपा आयुक्तांकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन, निलंबनासह फौजदारी…
land reservation saving action committee
शिरोळ विकास आराखड्याला जमीन आरक्षण बचाव कृती समितीचा विरोध; मेळाव्यात लढ्याचे रणशिंग फुंकले

दरवर्षी परळच्या राजाची भव्य आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढली जाते. पण यंदा परळच्या राजाचे विसर्जन गिरगाव चौपाटीऐवजी साध्या कृत्रिम तलावात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुठलीही विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नाही असे मंडळाने जाहीर केले आहे. त्याशिवाय यंदा वर्गणी देखील न काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खेतवाडीतही साध्या पद्धतीने साजरा होणार गणेशोत्सव
परळ, लालबाग पाठोपाठ गिरगाव खेतवाडीत गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी अखिल खेतवाडीतील गणेश मंडळे सुद्धा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहेत. दोन फुटापासून ते पाच फुटापर्यंत छोटया मुर्ती यंदा घडवण्यात येणार असल्याचे अखिल खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मध्यस्थ मंडळाकडून सांगण्यात आले. ही खेतवाडीतील ३१ गणेशोत्सव मंडळांशी संलग्न असलेली संस्था आहे.

‘मुंबईचा राजा’ गणेशगल्ली सुद्धा वर्गणी नाही काढणार
याच महिन्यात लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेशगल्लीने सुद्धा यंदा लोकांकडून वर्गणी न काढता गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशगल्लीचा गणपती मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी लाखो लोक गणेश गल्लीत दर्शनासाठी येत असतात. करोना व्हायरसने लोकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम केला आहे. त्यामुळे मंडळयाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा वर्गणी न काढता उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.