11 July 2020

News Flash

मॉलमधील वाहनतळ सर्व वाहनांना खुले

दोन मॉलनी शुल्क कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. इतर ठिकाणीही शुल्क कमी व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

वाहनतळ प्राधिकरणाच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद; सोमवार ते शुक्रवार वाहने उभी करता येणार

मुंबईतील वाहनतळांची टंचाई दूर करण्यासाठी शहरातील १३ मॉलमधील वाहनतळ यापुढे बाहेरील वाहनांसाठी खुले करण्याचा निर्णय मुंबई वाहनतळ प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार मॉलमधील वाहनतळ अशा वाहनांना पार्किंगसाठी वापरता येतील. त्याच वेळी मॉलच्या परिसरात वाहने उभी करण्यास मनाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

‘मुंबई वाहनतळ प्राधिकरणा’च्या बैठकीत मुंबईतील वाहनतळांच्या कमतरतेचा प्रश्न सोडविण्यासाठी मॉलकडे वाहनतळाची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सोमवार ते शुक्रवार दिवसा आणि रोज रात्री मॉलच्या वाहनतळावर खासगी वाहने उभी करता येणार आहेत. मात्र हे वाहनतळ सशुल्क असतील. आतापर्यंत दोन मॉलनी शुल्क कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. इतर ठिकाणीही शुल्क कमी व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

‘प्रादेशिक परिवहन प्राधिकरणा’कडे सध्या २४ लाख दुचाकी आणि १२ लाख चारचाकी वाहनांची नोंद आहे. इतक्या मोठय़ा संख्येने वाहने वाढल्याने मुंबईत वाहनतळांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जास्तीत जास्त वाहनांना वाहनतळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पालिका करत आहे. यामुळे रस्ते पादचाऱ्यांसाठी आणि वाहतुकीसाठी मोकळे होऊ शकतील. मॉलपासून १०० मीटर अंतरापर्यंत वाहने उभी केल्यास वाहनचालकावर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. मॉलप्रमाणेच रहिवासी संकुले, गोदामे, येथेही वाहनतळ सुरू करता येतील का याची चाचपणी पालिका करत आहे.  ‘‘रस्त्यावर उभी राहणारी वाहने वाहनतळांवर उभी राहू लागतील तेव्हा रस्ते मोकळे होतील. मात्र त्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून देणे हे पहिले पाऊल आहे,’’ असे मत वाहनतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांनी व्यक्त केले. ‘‘पार्किंगसाठी किती जागा उपलब्ध आहे याची माहिती पालिकेच्या अ‍ॅपवर प्रसिद्ध केली जाईल. यामुळे वाहनचालकाला वाहनतळाची माहिती मिळेल,’’ अशी माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या मॉलमध्ये वाहनतळ

स्टार मॉल( दादर) , नक्षत्र मॉल(दादर), सीआर २ मॉल(नरिमन पॉइंट), सिटी सेंटर मॉल(नागपाडा),  अट्रिया मॉल( वरळी), पॅलेडियम मॉल (परळ),  के. स्टार मॉल (चेंबूर), आर. सिटी मॉल(घाटकोपर),  इन्फिनिटी मॉल( अंधेरी पश्चिम), डी-मार्ट शॉपिंग(मुलुंड), ओबेरॉय मॉल( गोरेगाव), मार्क्‍स अ‍ॅन्ड स्पेन्सर( वांद्रे ), हब मॉल(गोरेगाव)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2019 12:53 am

Web Title: parking lot at the mall is open to all vehicles abn 97
Next Stories
1 स्मार्टफोन भाडय़ाने देणे आहे..
2 खड्डे दाखवून पाच हजार रुपयांची कमाई
3 लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ
Just Now!
X