राज्यात वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने आणि त्या तुलनेत पार्किंग नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे एकच वाहन खरेदी करण्यास परवानगी देण्याबाबतचा विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी वाहन आणि जागा यांचे समीकरण तयार करून राज्यासाठी लवकरच ‘पाìकग धोरण’ तयार करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

राज्यातील विभागीय मुख्यालये मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक तसेच इतर पालिका क्षेत्रांतील लोकसंख्येच्या प्रमाणात वाहतूक, आरोग्य परिवहन सुविधा उपलब्ध होण्यासंबंधी मुझफ्फर हुसन यांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना पाटील यांनी ही माहिती दिली.