News Flash

‘पार्ले टिळक’च्या सन्मानार्थ टपाल पाकीट

साहित्य, शिक्षण, क्रीडा, विज्ञान, राजकारण अशा सर्वच क्षेत्रांतील प्रभावी व्यक्तिमत्त्वे घडवणारी ही शिक्षणसंस्था यावर्षी शंभर वर्षे पूर्ण करत आहे.

पार्ले टिळक विद्यालय

शतक महोत्सवी वर्षात टपाल विभागाकडून शिक्षण संस्थेचा गौरव

मुंबई : १९२१ साली के वळ चार विद्यार्थ्यांसह सुरू झालेली शाळा ते पु. ल. देशपांडेंपासून अभिनेते सचिन खेडेकर यांच्यापर्यंतच्या अनेक व्यक्तिमत्त्वांना शिक्षणाचे धडे देणारे विद्यालय असलेली ‘पार्ले टिळक’ यंदा शतक महोत्सवी वर्ष पूर्ण करत आहे. मराठी माध्यमाच्या शाळेपासून सुरुवात करून आता नामांकित महाविद्यालये आणि व्यवस्थापन शिक्षण संस्था असा परीघ विस्तारत जाणाऱ्या या शिक्षण संस्थेच्या कार्याची दखल भारतीय टपाल विभागानेही घेतली आहे. ‘पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन’च्या शैक्षणिक कार्याचा सन्मान म्हणून एक विशेष टपाल पाकीट प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कायमस्वरूपी स्मारक निर्माण व्हावे या विचारातून पाल्र्यातील काही देशभक्त नागरिकांनी ९ जून १९२१ रोजी ‘पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन’ या शैक्षणिक संस्थेची स्थापना के ली. काळानुसार संस्थेचा शैक्षणिक पसारा वाढत गेला. पार्ले टिळक, परांजपे विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळांपासून सुरुवात करत संस्थेने काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा, आयसीएसई शाळा, साठ्ये महाविद्यालय, डहाणूकर महाविद्यालय, व्यवस्थापन अध्ययन संस्था (मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट) असा आपला परीघ वाढवत नेला. या संस्थेच्या शाळांमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत नाव कमवत आहेत. महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक पु. ल. देशपांडे, अभिनेते सचिन खेडेकर, पुष्कर श्रोत्री, अभिनेत्री मधुरा वेलणकर, बुद्धिपळपटू प्रवीण ठिपसे ही नामवंत मंडळी या शिक्षण संस्थेचेच माजी विद्यार्थी.

साहित्य, शिक्षण, क्रीडा, विज्ञान, राजकारण अशा सर्वच क्षेत्रांतील प्रभावी व्यक्तिमत्त्वे घडवणारी ही शिक्षणसंस्था यावर्षी शंभर वर्षे पूर्ण करत आहे. त्याचाच गौरव म्हणून संस्थेच्या १००व्या वर्धापनदिनी म्हणजेच येत्या ९ जूनला एका विशेष ऑनलाइन कार्यक्रमात मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांड्ये यांच्या हस्ते विशेष टपाल पाकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे.

शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. अविनाश सुपे यांच्यासह करोनाच्या काळात सेवा देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पार्ले टिळक विद्यालय या मराठी शाळेनेही शतकी वाटचाल पूर्ण के ली आहे. त्यानिमित्त शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने ‘शतकपूर्ती’ ही स्मरणिका  तयार करण्यात आली आहे. या स्मरणिके चे प्रकाशन माजी ज्येष्ठ शिक्षक हर्डीकर सर यांच्या हस्ते याच कार्यक्रमात होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रसारण

९ जूनला सकाळी ९ वाजता संस्थेच्या यूट्यूब वाहिनीवरून आणि फे सबुक पेजवर हा कार्यक्रम प्रसारित के ला जाईल.  www.youtube.com/parletilakvidyalayaassociation

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 12:03 am

Web Title: parle tilak vidyalaya hundred years postal department akp 94
Next Stories
1 मध्य रेल्वे मार्गावर १५ नाल्यांची सफाई
2 सीसीटीव्ही प्रकल्प कूर्मगतीने
3 खेरवाडीमध्ये घराची भिंत पडून एक ठार
Just Now!
X