News Flash

नवी मुंबई : वाशीमध्ये पादचारी पुल कोसळला; कोणतीही जीवितहानी नाही

रस्त्यावरुन जाणाऱ्या एका मोठ्या ट्रेलरच्या धडकेने या पूलाचा दुभाजकाजवळील अर्धा भाग कोसळल्याचे सुत्रांकडून कळते. हा भाग क्रेनने काढण्याचा प्रयत्न सुरु असताना क्रेनही कोसळली आहे.

नवी मुंबईतील वाशी येथे एक पादचारी पुल कोसळल्याचे वृत्त आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका मोठ्या ट्रेलरच्या धडकेने या पूलाचा दुभाजकाजवळील अर्धा भाग कोसळल्याचे सुत्रांकडून कळते. हा भाग क्रेनने काढण्याचा प्रयत्न सुरु असताना क्रेनही कोसळली आहे. मात्र, या अपघातात कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. वाशी पोलीस नाका येथे रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. रस्त्यावर पडलेल्या या पुलाचे अवशेष हटवण्याचे काम सुरु असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, सायन-पनवेल महामार्गावर हा पुल कोसळला असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2018 5:50 pm

Web Title: part of a foot overbridge collapsed near vashi police naka earlier this evening
Next Stories
1 पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य – उदयनराजे भोसले
2 ..तरच नवरात्रोत्सव मंडपांना परवानगी
3 ‘केईएम’च्या आवारातील भोंदूबाबाच्या मठावर हातोडा
Just Now!
X