दादर रेल्वे स्थानकात धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात खाली पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. शफीउद्दीन अब्दुलगनी खान (४३) असे त्याचे नाव आहे.
इगतपुरी येथील शफिउद्दीन हे शनिवारी सकाळी ६.३०च्या सुमारास दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर आले होते. त्यांनी धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ते फलाट व लोकलमधील मोकळ्या जागेतून रुळावर पडले. या अपघातात त्यांचे दोन्ही पाय तुटले.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना शीव रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करून घेण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.