15 December 2019

News Flash

उपनगरी गाडीवर काचेची बाटली मारल्याने प्रवासी जखमी

पोलिसांनी याप्रकरणी देवेंद्र पावसकर आणि  मनोज जैस्वार या दोघांना अटक केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मध्य रेल्वेवरील माटुंगा ते शीव स्थानकांदरम्यान लोकलवर काचेची बाटली फेकल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. यात २७ वर्षीय देवेंद्र पावसकर हा तरुण गंभीर जखमी झाला. गुन्ह्य़ात समावेश असलेल्या दोन आरोपींना अटक केल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

विक्रोळीत राहणारे प्रदीप त्रिपाठी यांनी गुरुवारी सायंकाळी  सीएसएमटी रेल्वे स्थानकातून कल्याण धिमी लोकल पकडली. लोकल माटुंगा ते शीवदरम्यान आली  असता धोबीघाटजवळ पश्चिम बाजूने रेल्वे रुळाच्या बाजूला बसलेल्या दोघांपैकी एकाने काचेची बाटली लोकलवर फेकली. ही बाटली डोक्याला लागून प्रदीप गंभीर जखमी झाला.  त्याला तात्काळ शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पोलिसांनी याप्रकरणी देवेंद्र पावसकर आणि  मनोज जैस्वार या दोघांना अटक केली आहे.

आरोपी रुळांच्या बाजूलाच मद्य पीत बसले होते. त्यांनी लोकलवर बाटली फेकून मारली आणि त्यामुळे एक प्रवासी गंभीर जखमी झाला. जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून दोन आरोपींना ३०७ कलमांतर्गत अटक केली आहे. यात दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, असे लोहमार्ग गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एन. धनवटे यांनी सांगितले.

First Published on July 20, 2019 1:06 am

Web Title: passenger injured as glass bottle flung at local train in mumbai zws 70
Just Now!
X