25 May 2020

News Flash

उपनगरी रेल्वेतून प्रवाशाला ढकलले

उपनगरी रेल्वे कुर्ला स्थानकात पोहोचत असतानाच चार प्रवाशांनी गुप्ता यांना लोकलमधून ढकलले.

(संग्रहित छायाचित्र)

कुर्ला स्थानकाजवळील घटना; आसनावरून चार प्रवाशांमध्ये वाद

मुंबई : आसन देण्यावरून झालेल्या वादामुळे एका प्रवाशाला उपनगरी रेल्वेमधून ढकलल्याचा प्रकार कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी घडला. विजयकुमार गुप्ता (वय ३५, रा. मानखुर्द) असे या प्रवाशाचे नाव असून, यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

गुप्ता हे सकाळी ८.५२ वाजता मानखुर्द येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेतून प्रवास करीत होते. या प्रवासादरम्यान आसन देण्यावरून गुप्ता यांचा तीन ते चार प्रवाशांसोबत वाद झाला. वादाची परिणती धक्काबुक्कीत झाली.

उपनगरी रेल्वे कुर्ला स्थानकात पोहोचत असतानाच चार प्रवाशांनी गुप्ता यांना लोकलमधून ढकलले. रुळावर पडल्यानंतर रेल्वेचे चाक हातावरून गेल्याने त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली.

हाताला गंभीर दुखापत

हा प्रकार निदर्शनास येताच लोहमार्ग पोलीस व प्रवासी त्यांच्या मदतीला धावले. जखमी अवस्थेतच आपल्या मोबाइलवरून गुप्ता यांनी पत्नी अनिताशी संपर्क केला व घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात त्यांना दाखल केले. यासंदर्भात वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.आर. पाल यांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. गुन्ह्य़ाचा उलगडा करण्यासाठी वाशी ते सीएसएमटीपर्यंतच्या सर्व स्थानकातील सीसीटीव्ही चित्रण तपासले जाणार आहे. सध्या विजयकुमार गुप्ता गंभीर जखमी असून बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांनी पत्नीला दिलेल्या माहितीवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 3:04 am

Web Title: passenger pushed out of moving train near kurla after dispute over seat zws 70
Next Stories
1 भिवंडीतील फुटीर नगरसेवकांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई?
2 एसटी आगार, बस स्थानकांची पाहणी करा
3 शाळांना आता विद्यार्थी संख्येनुसार अनुदान?
Just Now!
X