बेस्ट, लोकल गाडय़ांच्या मर्यादित संख्येमुळे प्रवाशांची गर्दी

मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता मर्यादित संख्येने चालविल्या जाणाऱ्या लोकल फे ऱ्या, प्रवासी संख्या वाढल्याने बेस्टवर वाढलेला ताण, आदी कारणांमुळे लोकल आणि बेस्टच्या प्रवासात शारीरिक अंतराचे नियम नकळत धाब्यावर बसवले जात आहेत. बेस्टच्या मिनी वातानुकूलित बसमध्येही प्रवाशांची धक्काबुक्की होत आहे. त्यामुळे हा प्रवास करोनाला निमंत्रण देणारा ठरू लागला आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ज्या काही तुटपुंजा फे ऱ्या होत आहेत त्या के वळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच. परिणामी बेस्टवरील ताण वाढू लागला आहे. त्यामुळे  शासनाने आखून दिलेल्या नियमांना तिलांजली मिळते आहे. गेल्या दोन महिन्यांत बेस्टचे प्रवासी जवळपास तिपटीने (सध्या ११,२४,५०० प्रवासी) वाढले आहेत. त्यांच्याकरिता बेस्टचा ३,३६१ बसगाडय़ांचा (यात ४६२ वातानुकू लित मिनी) ताफा रस्त्यावर असूनही उभ्याने पाच प्रवासी आणि प्रत्येक आसनावर एक प्रवासी हा नियम पाळणे अशक्य झाले आहे. कित्येकदा गाडय़ा खच्चून भरलेल्या असतात. नाइलाजाने प्रवाशांना हा धोकादायक प्रवास करावा लागतो. ‘बेस्टने रस्त्यावर उतरवलेल्या मिनी बसमध्ये तर रेटारेटीच असते. पण लोकल नसल्याने या पद्धतीने प्रवास करण्याशिवाय गत्यंतर नाही,’ असे नागपाडय़ाला राहणारे रुपेश शेलटकर यांनी सांगितले.

लोकल प्रवासातही तीच परिस्थिती आहे. अडीच ते तीन लाख अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता १५ जूनपासून लोकल चालविली जात आहे. त्यांच्याकरिता पश्चिम आणि मध्य रेल्वेवर दररोज प्रत्येकी ३५० लोकल फे ऱ्या होतात. परंतु कार्यालयीन वेळेत सोडल्या जाणाऱ्या लोकल फे ऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. अनेकदा प्रत्येक आसनावर तीन किं वा चार प्रवासी असतात, तर उभ्याने प्रवास करतानाही प्रवासी एकमेकांना खेटून उभे असतात. हे टाळण्याकरिता फे ऱ्या वाढवण्याची मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी के ली.

उपाय काय?

’ खासगी कार्यालयांच्या वेळा बदलणे गरजेचे आहे.

’ रेल्वे स्थानकातील काही प्रवेशद्वार, पादचारी पूल प्रवाशांसाठी बंद असून ते खुले करणे. जेणेकरून काही ठरावीक डब्यांमध्ये होणारी गर्दी टाळता येईल.

’ फे ऱ्याही काही प्रमाणात वाढवण्याची गरज.

बेस्ट बसमधून प्रवास करताना प्रवाशांनी शारीरिक अंतर ठेवले पाहिजे. करोनाकाळात बेस्ट उपक्र माने तसे नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी बसगाडय़ा जादा उपलब्ध करणेही गरजेचे आहे. मुंबई पालिका आयुक्तांकडे ही मागणी के ली जाणार आहे.

– रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका