06 July 2020

News Flash

करोनाच्या धास्तीने प्रवाशांची एसटीकडे पाठ

पाच दिवसांत राज्यभरात ९३ हजार प्रवासी

संग्रहित छायाचित्र

एसटी महामंडळाने लाल क्षेत्र वगळता जिल्हांतर्गत एसटी बससेवा सुरू के ली असली तरी करोनाच्या धास्तीने प्रवाशांचा फारसा प्रतिसाद लाभलेला नाही. प्रवाशांना नियमावलीचाही जाच वाटतो आहे. २२ ते २६ मेपर्यंत ९३ हजार प्रवाशांनीच प्रवास के ला आहे. राज्यांर्तगत एसटी प्रवासाचा प्रश्न मात्र अद्याप सुटू शकलेला नाही.

२२ मेपासून जिल्हाअंतर्गत एसटी चालविली जात आहे. परंतु, लग्नकार्य, यात्रा-जत्रा या सर्वावर बंदी असल्याने तो प्रवासी वर्ग कमी झाला आहे. याशिवाय ग्रामीण भागांमध्ये शेतीच्या मशागतीचे कामही सुरू असल्याने बहुतेक लोक त्यातही गुंतली आहेत. परिणामी जिल्हांतर्गत प्रवास कमीच होत आहे.

२६ मेपर्यंत ३ हजार ११८ बस गाडय़ांच्या १४ हजार २८२ फेऱ्या झाल्या. यातून ९३ हजार ३९३ प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी येथून ३२ हजार ७२१ प्रवाशांनी प्रवास केला. पाठोपाठ नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा येथून १७ हजार ८०५ आणि अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ येथून १५ हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास आहे. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूरमधून आतापर्यंत ९ हजार २४४ प्रवाशांनी एसटीचा पर्याय स्वीकारला. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे जिल्हा, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगरममधून अत्यंत कमी प्रवाशांनी प्रवास केल्याचे सांगितले.

राज्यांतर्गत प्रवासाचा निर्णय नाहीच

जिल्हांतर्गत प्रवास सुरू झाला असला तरीही अद्याप राज्यांर्तगत प्रवासासाठी बंदीच आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून शहर व गावांत अनेक जण अडकले असून एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्हयात जाता-येत नाही. त्यामुळे हा प्रवास सुरू करण्याचीही मागणी होत आहे. जिल्हांतर्गत एसटी प्रवासासाठी असलेली अट आणि मर्यादित वेळेतच (सकाळी ७ ते सायंकाळी ७) प्रवास करता येत असल्याने प्रवासी कमी मिळत असल्याचाही अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 12:10 am

Web Title: passengers turn back to st in fear of corona abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 मृतदेह दहनाच्या रांगेत!
2 मुंबईत दोन डॉक्टरांचा करोनामुळे मृत्यू; आयसीयू बेडसाठी दोन दिवस बघावी लागली वाट
3 ‘अन्नच नाही, बाळाला काय खाऊ घालायचं?’ एका आईची आर्त हाक
Just Now!
X