News Flash

स्पर्धा परीक्षेतील यशाचा मार्ग

नाशिकचे पोलीस आयुक्त आयपीएस विश्वास नांगरे-पाटील या वेबसंवादात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

संग्रहित छायाचित्र

स्पर्धा परीक्षेतून आपले करिअरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण गाव-खेडय़ांतून मोठय़ा शहरांत दाखल होतात. मात्र, करोनामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना पुन्हा गावाकडे परतावे लागले आहे. अभ्यासिका आणि वाचनालयाची पुरेशी सुविधा नसल्याने शहरातील विद्यार्थ्यांचीही अडचण झाली आहे. त्यामुळे अभ्यास कसा करावा, अभ्यास साहित्य कसे मिळवावे, या कठीण काळात मनोबल टिकवून ठेवण्यासाठी काय करावे? असे अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षार्थ्यांना सतावत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरू’ या विशेष वेबसंवादात बुधवार, ८ जुलै रोजी मिळणार आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त आयपीएस विश्वास नांगरे-पाटील या वेबसंवादात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सहभागासाठी https://tiny.cc/LS_SpardhaParikshaGuru_3 या लिंकवर नोंदणी आवश्यक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:24 am

Web Title: path to success in competitive exams abn 97
Next Stories
1 ‘सुबोध’ गप्पांचा ‘भावे’ प्रयोग
2 मुंबईत करोनाबरोबरच डेंग्यूचाही धोका!
3 निकालाबाबत स्पष्टता नसल्याने ‘मिठीबाई’चे विद्यार्थी अस्वस्थ
Just Now!
X