27 October 2020

News Flash

रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ८२ टक्क्य़ांवर स्थिरावले

२४ तासांत २,३५२ नवे बाधित, ४३ रुग्णांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

गेले काही दिवस मुंबईतील करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढते आहे. असे असले तरीही रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सरासरी ६६ दिवसांवर, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्य़ांवर स्थिरावले आहे. मुंबईत गुरुवारी दिवसभरात २,३५२ जणांना करोनाची बाधा झाली, तर ४३ रुग्णांचा मृत्यू झाला.

गणेशोत्सवानंतर मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या वाढतेच आहे. आतापर्यंत मुंबईतील दोन लाख सात हजार ४९४ जणांना करोनाची बाधा झाली आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले १,४१० रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत एक लाख ७० हजार ६७८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गुरुवारी मृत्यू झालेल्या ४३ जणांमध्ये ३३ पुरुष, तर १० महिलांचा समावेश होता. तसेच यापैकी ३६ जणांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत करोनामुळे आठ हजार ९६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये आजघडीला २७ हजार ४३७ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.

करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिकेने मोठय़ा प्रमाणावर चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ११ लाख २९ हजार ८६९ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे मुंबईतील १० हजार ३७२ इमारती टाळेबंद करण्यात आल्या आहेत. तर ६७२ ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत. करोनाच्या संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी टाळेबंद इमारती आणि प्रतिबंधित क्षेत्रांमधून बाहेर येण्या-जाण्यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 12:32 am

Web Title: patient coronation rate stabilized at 82 percent abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन तूर्त स्थगित
2 एकाच इमारतीत २२ रुग्ण
3 निवासी संकुलांमध्ये संसर्गात वाढ
Just Now!
X