परळ येथील केईएम रुग्णालयात एका रुग्णाने रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मंजुनाथ (४०) असे या रुग्णाचे नाव असून या घटनेत त्याच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मंजुनाथ हा रुग्णालयाच्या अपघात विभागात आला होता. तेथे त्याच्यावर उपचार करण्यास विलंब झाल्याने त्याची सहनशक्ती संपली आणि त्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन खाली उडी मारली. यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयाच्या अपघात विभागात नेले.