26 February 2021

News Flash

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला सक्तीने केलं क्वारंटाइन

...म्हणून गोरेगावच्या गेस्टहाऊसमध्ये राहतोय अधिकारी

(फोटो सौजन्य - Facebook/@vinaytiwariipsofficial)

बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने सक्तीने क्वारंटाइन केलं आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी रविवारी हा आरोप केला. विनय तिवारी मुंबईत तपासासाठी आलेल्या बिहार पोलिसांच्या टीमचे नेतृत्व करत आहेत. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारावर तपास करण्यासाठी हे पथक मुंबईत आले आहे.

“बिहार पोलीस पथकाचे नेतृत्व करण्यासाठी आयपीएस अधिकारी विनय तिवारी रविवारी मुंबईत दाखल झाले. पण रात्री ११ वाजता मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना सक्तीने क्वारंटाइन केलं” असं बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी टि्वट केले आहे. “विनंती करुनही त्यांना आयपीएस मेसमध्ये राहण्यासाठी जागा मिळाली नाही. ते गोरेगावच्या एका गेस्टहाऊसमध्ये राहत आहेत” असे टि्वटमध्ये म्हटले आहे.

२४ जूनला सुशांत सिंह राजपूतने वांद्रयातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मागच्या महिन्यात सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये या प्रकरणी एफआयआर नोंदवला व तक्रारीत रेहा चक्रवर्तीचे नाव घेतले. मुंबई पोलीस सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींसह ४० जणांची या प्रकरणी चौकश करण्यात आली आहे.

सुशांतच्या अकाऊंटमधून रियाने ९० दिवसांत खर्च केले तीन कोटी रुपये

बिहार पोलिसांनी रियाच्या बँक अकाऊंटची माहिती काढली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार रियाने गेल्या ९० दिवसांत सुशांतच्या अकाऊंटमधून तब्बल तीन कोटी रुपये खर्च केल्याची माहिती बिहार पोलिसांना मिळाली आहे.

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे. त्यामुळे रियाच्या आर्थिक व्यवहारांची माहिती बिहार पोलिसांनी मिळवली आहे. सुशांतच्या नातेवाईकांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 8:49 am

Web Title: patna ips officer probing sushant singh rajput case forcibly quarantined in mumbai says bihar dgp dmp 82
Next Stories
1 सुशांत सिंह प्रकरण : मुंबई पोलिसांसंदर्भातील नकारात्मक बातम्यांवर केदार शिंदेंचा संताप, म्हणाले…
2 Raksha Bandhan 2020 : बॉलिवूडमधील लोकप्रिय बहीण- भावाच्या ‘या’ जोड्या माहितीयेत का?
3 Raksha Bandhan 2020 : बॉलिवूडमधील ‘या’ गाण्यांमुळे यंदाचं रक्षाबंधन होईल खास
Just Now!
X