13 August 2020

News Flash

करोनाबाधित मृतदेहांच्या दफनविधीचा मार्ग मोकळा

करोना बाधितांच्या मृतदेहातून या विषाणूचे संक्रमण होत असल्याचा कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही

संग्रहित छायाचित्र

एखाद्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही प्रतिष्ठेने व्हायला हवा. तो त्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार असून करोनासारख्या महासाथीच्या काळातही तो कोणी हिरावू शकत नाही, असे नमूद करत करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या दफनविधीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्या.

करोना बाधितांच्या मृतदेहातून या विषाणूचे संक्रमण होत असल्याचा कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही. शिवाय करोनाबाधितावर कोणत्या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करायचे वा कुठल्या कब्रस्तानात दफनविधी करायचा याचा निर्णय घेण्याचा पालिकेला सर्वस्वी अधिकार आहे, असेही मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने नमूद केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कब्रस्तानमधील विशेषत: वांद्रे येथील बडा कब्रस्तानमध्ये करोनाबाधितांच्या मृतदेहाचा दफनविधी करण्यातील अडथळा दूर झाला आहे.

वांद्रे येथील बडा कब्रस्तानप्रकरणी याचिका करणाऱ्याला दंड सुनावण्याची तयारीही न्यायालयाने दाखवली होती. मात्र सध्याच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दंड सुनावण्यापासून स्वत: रोखले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 12:42 am

Web Title: pave the way for the burial of corona positive bodies abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 वैद्यकीय चाचणी केल्यानंतर २४ तासात अहवाल द्या!
2 रुग्णालये ओसंडली..
3 ‘लोकसत्ता विश्लेषण’मध्ये मंगळवारी अजित रानडे
Just Now!
X