पवनहंस कंपनीचे हेलिकॉप्टर बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दक्षिण मुंबईहून ८० सागरी मैलांवर समुद्रात कोसळले. हेलिकॉप्टरमधील दोन वैमानिक बेपत्ता झाले आहेत. नौदलाने तातडीने शोधकार्य सुरू केले असून, दोन मदतनौका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. ई. सॅम्युअल आणि टी. के. गुहा अशी या वैमानिकांची नावे आहेत.

पवनहंसचे हेलिकॉप्टर रात्रीचे सरावकार्य करीत होते. हेलिकॉप्टरमध्ये कोणी प्रवासी नव्हते. हेलिकॉप्टरचा एक दरवाजा आढळल्याची माहिती कमांडर राहुल सिन्हा यांनी दिली.