06 July 2020

News Flash

मद्य हाती पडल्यावरच पैसे द्या!

मागणीप्रमाणे मद्य मिळाल्यावरच पैसे अदा करा, असे आवाहन मद्यविक्रेत्यांनी नागरिकांना केले आहे.

संग्रहित छायाचित्र

मुंबई : मागणीप्रमाणे मद्य मिळाल्यावरच पैसे अदा करा, असे आवाहन मद्यविक्रेत्यांनी नागरिकांना केले आहे. तर गुगलद्वारे मद्यविक्री दुकानांसह (वाईन शॉप) अन्य कोणताही संपर्क क्रमांक शोधताना सतर्क राहा, अशी सूचना सायबर पोलिसांनी केली आहे.

मद्य पोच केल्यावरच ग्राहकांकडून पैसे स्वीकारले जात आहेत. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार ग्राहकांनी टाळावेत, असे आवाहन असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह रिटेल लीकर वेन्डर्सचे उपाध्यक्ष सुमित चावला यांनी के ले.  गुगलच्या एडिट अ‍ॅण्ड सजेस्ट पर्यायाचा वापर करून भामटय़ांनी भ्रमणध्वनी क्र मांक बँका, , त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रांसह वाइन शॉपच्या नावेही जोडला आहे. अनेकांनी घरानजीकच्या वाइन शॉपचा संपर्क क्र मांक मिळवला. यापैकी काहींनी त्या क्र मांकावर मद्याची मागणीही के ली. यातील काहींना आगाऊ पैसे भरण्यास सांगून भामटय़ांनी गंडा घातला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 2:38 am

Web Title: pay after receiving liquor dd70
Next Stories
1 करोनाचा कहर : मुंबईतून ३१ हजार प्रवाशांचे ‘उड्डाण’
2 खासगी रुग्णालयात फरफट
3 पहिल्या दिवशी १६ हजार प्रवासी परराज्यांकडे रवाना
Just Now!
X