27 May 2020

News Flash

‘एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट वेतन द्या’

करोनामुळे प्रवाशांनी प्रवासच नाकारल्याने एसटीला मार्च महिन्यात मोठय़ा प्रमाणात बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.

संग्रहित छायाचित्र

देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्थाही बंद आहे. एसटी अत्यावश्यक सेवाच देत आहे. सध्या संचारबंदी असल्याने वेतन बिले तयार करणारे कर्मचारीही कार्यालयात पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांना १ एप्रिल व ७ एप्रिलला त्यांच्या बँक खात्यावर सरसकट वेतन जमा करण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी महामंडळाकडे केली आहे. करोनामुळे प्रवाशांनी प्रवासच नाकारल्याने एसटीला मार्च महिन्यात मोठय़ा प्रमाणात बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
त्यानंतर १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याने एसटीनेही अत्यावश्यक सेवाच देण्याचा निर्णय घेतला असून बाकी राज्यातील सर्व सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे मोठय़ा आर्थिक नुकसानीलाही महामंडळाला सामोरे जावे लागणार असल्याचे सांगितले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 1:12 am

Web Title: pay salaries to st employees abn 97
Next Stories
1 टेलीमेडिसीनची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
2 करोनाशी लढा : पोलिसांवर किती ताण टाकायचा याचा विचार व्हायला हवा – उद्धव ठाकरे
3 बार मालकाची अनोखी शक्कल, इन्स्टाग्रामवरून मद्य विक्री
Just Now!
X