09 March 2021

News Flash

चेतना महाविद्यालयातील चाकूहल्ला प्रकरण : पायल बलसाराचा मृत्यू

वांद्रे (पू.) येथील खेरवाडीतील चेतना महाविद्यालयामध्ये बीएमएसच्या तिसऱ्या वर्गात शिकणारी पायल बलसारा (२२) हिचा आज (मंगळवार) सकाळी अकराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रेमास नकार दिल्याने

| December 25, 2012 12:15 pm

वांद्रे (पू.) येथील खेरवाडीतील चेतना महाविद्यालयामध्ये बीएमएसच्या तिसऱ्या वर्गात शिकणारी पायल बलसारा (२२) हिचा आज (मंगळवार) सकाळी अकराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रेमास नकार दिल्याने संतप्त झालेल्या निखील बनकरने (२२) या तरुणाने शनिवारी सकाळी चाकूने वार करून स्वत:ला जखमी करून घेतले होते. या दोघांना त्वरित गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्याच दिवशी दुपारी निखीलचा मृत्यू झाला होता, तर पायलची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी तीचा रूग्णालयात मृत्यू झाला.
पायलचे आई-वडील मीरा रोड येथे राहात असून पायल कलिना येथे आपल्या मामाकडे राहात होती. निखील आणि पायल दोघेही एकत्र शिकत होते आणि ते चांगले मित्र होते. पण निखीलचे पायलवर प्रेम होते. तो वारंवार तिला प्रेमासाठी आग्रह करीत होता. हा प्रकार पायलने आपल्या मामांच्या कानावर घातला होता. मामांनी पोलीस ठाण्यात आणि महाविद्यालयात निखीलची तक्रारही केली होती. याबाबत निखीलच्या पालकांना समजही देण्यात आली होती. त्यानंतर पायलने निखीलशी मैत्री तोडली होती. मात्र, प्रेमास नकार दिल्याने संतप्त झालेल्या निखिल पायलवर चाकूने वार करून स्वत:लाही जखमी करून घेतले होते.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 12:15 pm

Web Title: payal balsara dies
Next Stories
1 कंटेनरच्या ट्रॉलीत कार घुसून तीन ठार
2 जलसंपदा विभागामुळे रखडला पालिकेचा जलविद्युत प्रकल्प!
3 पवारांचा आता पुतण्यालाच कात्रजचा घाट!
Just Now!
X