वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ‘मातोश्री’च्या अंगणात राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आणि शिवसेनेने त्यामध्ये बाजी मारली. निवडणुकीच्या आधी ‘एमआयएम’ला लक्ष्य करणारी शिवसेना मतमोजणीनंतर अचानक नारायण राणे यांच्या पराभवाचा जल्लोष साजरा करताना दिसत आहे. मालवणमध्ये राणे यांनी शिवसेनेला चारीमुंडय़ा चीत केले होते, यावेळी आपल्या बालेकिल्ल्यात निवडणुक जिंकून शिवसेनेने राणेंचे चांगलेच उट्टे काढले आहे. राणेंच्या पराभवानंतर सोशल मिडियावर त्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यापैकी काही निवडक प्रतिक्रिया..

ब्रेकिंग न्यूज : अजून दोन तासांनी नारायण राणे यांचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये समाविष्ट होणार. सहा महिन्यांत दोन ठिकाणी विधानसभेच्या दोन निवडणुकांत पराभूत होण्याची किमया साधणारे देशातले पहिले माजी मुख्यमंत्री ठरणार. यानिमित्त राणे यांच्या स्वागताची सिंधुदुर्गात जोरदार तयारी. नारायण राणे हे अजूनही #MaukaMauka च्या प्रतिक्षेत आहेत.

नारायण राणे आता कोणता मंत्र जपतील? – नारायण !!! नारायण !!!!