राज्यात आज ग्रामपंचायत निकालांचा धुरळा उडाला असून यात अनेक दिग्गजांना धक्का तर अनेकांनी अनपेक्षितपणे मुसंडी मारत कामगिरी नोंदवली आहे. यामध्ये महाविकास आगाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चांगल यश मिळताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या निकालांवर प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा- ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेंचा पराभव केल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

ठाकरे म्हणाले, “मला वाटतं जनतेचा विश्वास ठामपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह संपूर्ण महाविकास आघाडीवर आहे. ही नेते मंडळी चांगलं काम पाहत आहेत. यांनी चांगल्या पद्धतीने करोनाची परिस्थिती सांभाळली असून अजूनही सांभाळत आहोत. आपण हळूहळू सर्वकाही उघडत आहोत. लोकांची काळजी घेऊन कुठेही घाईगडबड न करता जबाबदारीनं काम करत आहोत. त्याचबरोबर पर्यावरण, उद्योग क्षेत्राला आपण पुढे घेऊन चाललो आहोत.”

आणखी वाचा- “घासून नाय, तर विरोधकांची ठासून”! मनसेनं ‘या’ ग्रामपंचायतींवर फडकावला विजयाचा झेंडा

कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांच्या गावातच भाजपाचा पराभव होऊन शिवसेनेचा विजय झाला यावर बोलताना ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राचं नेतृत्व एका चांगल्या हातात आहे. त्यामुळे गावात, शहरात आणि कुठल्याही जिल्ह्यात असतील महाविकास आघाडीवर लोकांचा ठामपणे विश्वास आहे.