मुंबई :  कोकणच्या वैभवात आणि विकासात भर घालणाऱ्या मात्र गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास अखेर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्याने या विमानतळावरून प्रवासी विमानांचे उड्डाण होण्याचा मार्ग मोकळा झाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कु डाळ तालुक्यातील चिपी येथे आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट  प्रा.लि. कं पनीने सुमारे ८०० कोटी रुपये खर्चून विकसित के लेला हा पहिला ग्रीनफील्ड विमानतळ आहे. या विमानतळाचे आधी उद्घाटन झाले असले तरी या विमानतळावरून विमानांचे उड्डाण मात्र होऊ शकले नव्हते. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ९ ऑक्टोबरला या विमानतळाच्या उद्घाटनचा नवा मुहूर्त जाहीर के ला होता. राज्य शासनानेही स्वतंत्रपणे उद्घाटन समारंभाची घोषणा के ली होती. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्याची आवश्यकता नाही अशी भूमिका घेतल्यावर राज्य शासनाने राणे यांना प्रमुख पाहुण्यांच्या यादीतून वगळले.

pune airport marathi news
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…
Mumbai airport, Take-off and landing,
महत्त्वाचे : मुंबई विमानतळावर ९ मे ला टेकऑफ – लँडिंग तब्बल सहा तास बंद रहाणार, वाचा सविस्तर…
mumbai airport gold smuggling
मुंबई विमानतळावरून दोन कोटींचे सोने जप्त
Thane Police Arrests, Interstate Thief Operating, Between Assam and Mumbai, Solves 22 Cases, theft of assam, thane theft, navi mumbai theft, mumbai theft, aeroplane, marathi news, crime news, robbery news,
चोरीसाठी विमानाने मुंबईचा प्रवास, नागालँड आसाम मधील चोरट्याला अटक

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या विमानतळावरून विमान उड्डाणास परवानगी दिली आहे. त्यामुळे या विमानतळाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असून प्रवासी विमान उड्डाणे सुरू करण्याचाही कं पनीचा मार्ग मोकळा झाला आहे. या परवान्यामुळे या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा पार झाल्याचे आयआरबीचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांनी सांगितले. सामंजस्य करारानुसार सुमारे ९० वर्षे हे विमानतळ आयआरबी कंपनीच्या ताब्यात राहणार आहे.

होणार काय?

कोकण आता मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, दक्षिणेकडील राज्ये तसेच देशाच्या अन्य भागांशीही हवाई मार्गाने जोडला गेल्याने प्रवासी तसेच मालवाहतुकीला फायदा होणार आहे.